Sanavivi

  •  

 

  • जानेवारीचा सनविवि
  • फेब्रुवारीच सनविवि 
  • संस्थापक दिन - दि. ३१ मार्च रोजी (अभिमान व योगदान पुरस्कार सोहळा) - पैसा म्हणजे नक्की काय? तुम्ही म्हणाल काय वेड़्यासारखा प्रश्न आहे. पैसा म्हणजे आपण वापरतो त्या नोटा...मग एखादी जुनी नोट वापरातून काढायचा आदेश येतो तेव्हा त्याच नोटेचा होतो फक्त एक कागद. मग आधी त्याची जी शक्ती असते ती नेमकी कशामुळे? बरं ही शक्ती तरी स्थिर आहे का? मागच्या महीन्यात शंभराची नोट घेऊन भाजी आणली तर या महीन्यात त्याच्यापेक्षा कमी भाजी येते. मग शंभर रुपयाच्या नोटेची खरी किंमत किती? हीच शंभराची नोट हातात यायला कुणाला एकशे चाळीस रुपये कमवावे लागतात तर कुणाला शंभर कमावून सगळे हातात पडतात. आता शंभर रुपये उसने घ्यायला गेलं तर मैत्रीच्या बॅंकेत ते बिनव्याजी मिळणार आणि क्रेडिट कार्डावर घेतले तर अगदी ३६ टक्के व्याज देखील आकारले जाणार. आता जरा आणखी अवघड प्रश्न. काळा, पांढरा पैसा म्हणजे नक्की काय? ह्याचे सोपे उत्तर आपल्या सगळ्यानाच माहीत आहे. पण पावती न घेता, किंवा टॅक्स न भरता आपण वस्तू विकत घेतो आणि आपला पांढरा पैसा काळा करतो, आणि आपल्या कामाचा मोबदला आपण रोकड घेतो आणि टॅक्स न भरता तो हळूहळू वस्तू किंवा सेवा विकत घेताना खर्च करतो...पांढरा करतो. हे अगदीच सोपे झाले. आता शेवटच्या टप्प्यावरचे प्रश्न...एकही जीवनदायिनी शिल्लक राहिलेली नाही. उत्तराला तुम्ही कितीही वेळ घेऊ शकता... पैशाच्या वापराचा आणि आपल्या समाजरचनेचा काही संबंध आहे? बदलत्या समाजव्यवस्थेचे आणि अंगिकारलेल्या अर्थव्यवस्थेचे नेमके नाते कोणते? वेगवेगळ्या देशात त्याच अर्थव्यवहाराचे नियम आणि दर वेगळे का आणि कसे? मल वाटतं मी आता थांबतो... कारण प्रश्न थांबत नाहीत आणि उत्तरं शोधणं अवघड झाले आहे...तेव्हा खेळ सोडायची परवानगी आहे पण ती एका अटीवर. विचारलेल्या आणि त्याहूनही जटिल प्रश्नांची सहजसुंदर उकल करण्यासाठी येत आहेत, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील या वर्षीच्या संस्थापक दिनाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून... दिनांक ३१ मार्च २०१४, सायं. ६ वा. स्थळ: "अर्था"तच महाराष्ट्र मंडळ, गांधीनगर. अट लक्षात आली असेलच.